Monday, August 17, 2026
HomeCrimeचंद्रपूर पोलिसांची दमदार कामगिरी

चंद्रपूर पोलिसांची दमदार कामगिरी

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाने विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला तब्बल ३ कोटी ५९ लाख रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल मूळ मालक व फिर्यादींच्या स्वाधीन करून नागरिकांना मोठा दिलासा दिला. स्वातंत्र्यदिनाचे Independence Day औचित्य साधून तुकूम येथील पोलिस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधितांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. Chandrapur Police

भारतीय न्याय संहितेच्या नव्या कायद्यानुसार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी वाहने, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल तसेच सायबर फसवणुकीतील रक्कम हस्तगत केली होती. तपास प्रक्रियेनंतर कायदेशीर बाबी पूर्ण करून हा मुद्देमाल संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आला.

चोरीला गेलेली वाहनेही मिळाली परत
पडोली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अशोक लेलँड ट्रक, ४२ गॅस सिलिंडर व रोख रक्कम, तसेच राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आलेले सुमारे ३९ लाख रुपयांचे टाटा आयशर वाहन संबंधित मालकांना परत करण्यात आले. याशिवाय विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट, होंडा शाईन, स्प्लेंडर, अ‍ॅक्सेस यांसारख्या दुचाकी वाहनांचाही शोध घेऊन ती मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आली.

लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने परत
रामनगर, बल्लारपूर, सावली आणि घुग्घुस पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांत हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे पाटल्या, चपलाकंठी, पोत, अंगठ्या, लॉकेट, सोन्याचे लगड तसेच चांदीची भांडी व नाणी असा मौल्यवान ऐवज तक्रारदारांना परत करण्यात आला.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ३४ लाख ८६ हजार रुपयांचा, बल्लारपूरमधील १८ लाख २३ हजार रुपयांचा, सावलीतील २४ लाख ७५ हजार रुपयांचा तर घुग्घुस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे १४ लाख ४१ हजार रुपयांचा दागिन्यांचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला.

सायबर फसवणुकीतील ९२ लाखांहून अधिक रक्कम वाचवली
ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांच्या सायबर सेलनेही प्रभावी कामगिरी बजावली. NCCRP प्रणालीच्या माध्यमातून तातडीने कारवाई करून सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या तक्रारदारांची तब्बल ९२ लाख ८६ हजार २३९ रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात आली.
सायबर गुन्ह्यांची माहिती मिळताच संबंधित बँका व यंत्रणांशी समन्वय साधून रक्कम थांबविणे आणि ती परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला.

४९ लाखांहून अधिक रोख रक्कमही संबंधितांच्या स्वाधीन
विविध गुन्ह्यांच्या तपासात पडोली व रामनगर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली ४९ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम देखील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमधून हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल फोन CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन पोलिस ठाण्यांचा गौरव
मुद्देमाल जप्ती, तपास आणि हस्तांतरणाच्या प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रथम क्रमांक – रामनगर पोलिस ठाणे : सुमारे ६५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून परत करण्यात आला. ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके आणि मुद्देमाल हेड मोहरर सफौ/२०२० अनिल आनाम यांचा गौरव करण्यात आला.
द्वितीय क्रमांक – बल्लारपूर पोलिस ठाणे : सुमारे ३० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे आणि मुद्देमाल हेड मोहरर पोहेवा/१६१ श्रीकांत मेंढे यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले.
तृतीय क्रमांक – सावली पोलिस ठाणे : सुमारे १५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संबंधितांना परत करण्यात आला. ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार आणि मुद्देमाल हेड मोहरर पोहेवा/२४८४ विनोद वाघमारे यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकनुरुी नरेश, पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी उपस्थितांचे स्वागत करून चंद्रपूर पोलिस दलाच्या कामगिरीचा आढावा मांडला. पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी चंद्रपूर पोलिसांच्या तपासकौशल्याचे, गुन्हे उकलण्याच्या कार्यक्षमतेचे आणि नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular