Monday, August 17, 2026
HomeMaharashtraपाटण येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

पाटण येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

चंद्रपूर :- काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जिवती तालुक्यातील मारई पाटण येथील भाजप व अन्य अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या जिवती दौऱ्यादरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. BJP workers from Patan join the Congress party चंद्रपूर पोलिसांची दमदार कारवाई, 3 कोटी 59 लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन……..

जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे हे जिवती काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर असताना मारई पाटण येथील भाजपचे रामचंद्र सदाशिव खटके, लक्ष्मण बाबुराव सुरणर, रमेश धोंडिबा जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुभाषभाऊ धोटे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे काँग्रेसचे दुपट्टे देऊन स्वागत केले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात जिवती तालुक्यात काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी सक्रियपणे जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यावर भर देण्यात आला.

या पक्षप्रवेशामुळे जिवती तालुक्यात काँग्रेसच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून, विविध सामाजिक घटकांतील कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारधारेसोबत जोडले जात असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भीमराव पाटील मडावी, तिरुपती पोले, कलीम भाई, अब्बास भाई, गजानन वाघमारे, चव्हाण ताई यांच्यासह जिवती काँग्रेसच्या विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular