Thursday, August 13, 2026
HomeHealthनशामुक्त समाजासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा - आ. किशोर जोरगेवार

नशामुक्त समाजासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर :- नशामुक्त समाज ही काळाची गरज असूनव्यसनाच्या विळख्यात अडकणार्या युवकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. नशामुक्तीची सुरुवात स्वतःपासून करून कुटुंब आणि समाजाला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नुकसान होत नाहीतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहेअसे प्रतिपादन MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Everyone should take the initiative for a drug-free society

   तुकुम येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नागरिकांनी नशामुक्त समाजनिर्मितीची प्रतिज्ञा घेतली. यावेळी यावेळी डॉ. सचिन परबकुंदा बेहननरेशप्रेमकुमारस्वेता सावलीकरनिरंजन उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीआज व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बिकट होत आहे. विशेषतः युवा पिढीला या विळख्यातून दूर ठेवणे ही पालकशिक्षकसामाजिक संस्था आणि समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. युवकांनी आपल्या ऊर्जेचा उपयोग शिक्षणक्रीडाकौशल्यविकास आणि समाजोपयोगी कार्यासाठी करावाअसे आवाहन त्यांनी केले.

  ते पुढे म्हणाले कीनशामुक्ती हा केवळ एका दिवसाचा संकल्प न राहता ती जीवनशैली बनली पाहिजे. एका व्यक्तीला व्यसनापासून दूर करण्यात यश आले तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे नशामुक्तीची चळवळ घराघरापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले नशामुक्ती जनजागृतीचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असूनअशा उपक्रमांना नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावेअसेही सांगितले.

           यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे पदाधिकारीआणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी नशेपासून दूर राहण्याची तसेच समाजातील इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याची प्रतिज्ञा घेतली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular