Monday, July 13, 2026
HomeCultural"माझं जगण माझा अर्थ" आत्मकथन म्हणजे संघर्षातून जन्मलेल्या जिद्दीचा आणि माणुसकीचा प्रवास

“माझं जगण माझा अर्थ” आत्मकथन म्हणजे संघर्षातून जन्मलेल्या जिद्दीचा आणि माणुसकीचा प्रवास

Grand launch of Prof. Dr. Santosh Dethe’s “Majhe Jagan Majha Artha” (My Life, My Meaning) autobiography

चंद्रपूर :- आयुष्यभर ज्ञानदान आणि सेवाभाव आणि संसाराची शिदोरी जपत विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारे सेवानिवृत्त प्रा.डॉ.संतोष देठे यांच्या माझं जगणं माझा अर्थ या आत्मकथनाचा दिनांक 12 जुलै 2026 रोजी पुस्तकरूपात थाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉ. संजय गोरे म्हणाले हे आत्मकथन केवळ एका व्यक्तीचं नाही तर संघर्ष जिद्द आणि माणुसकीच्या वळणावर उभ्या राहिलेल्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन असून खचलेल्या प्रत्येक व्यक्तीला या आत्मकथनातून संजीवनी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “Majh Jagan Majha Artha” autobiography

राम मंदिर देणगी घोटाळ्या विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह……

यावेळी सदर प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून अँड. संजय भाऊ धोटे माजी आमदार राजुरा ,उद्घाटक नितीन कुमार चिंचोलकर पोलीस निरीक्षक राजुरा ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय गोरे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,तर प्रमुख अतिथी म्हणून दौलतराव भोंगळे, माजी प्राचार्य तथा सहसचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, अविनाश जाधव ,सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, डॉ.प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा, पी. यू. बोंडे ,डॉ. राजकुमार मुसने महात्मा फुले महाविद्यालय आष्टी डॉ. राजेश खेरानी ,उपप्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी देठे परिवारांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. प्रकाशकाच्या वतीने लेखक डॉ.संतोष देठे यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.शरद बेलोरकर, डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा.सुयोग साळवे, अविनाश दोरखंडे यांनी प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती राहून मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी राजुरा शहरातील विविध संस्था पदाधिकारी, गणमान्य व्यक्ती, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सौरभ मिश्रा, मृणाल मिश्रा- देठे, कु.प्रांजल देठे यांनी यशस्वीपणे केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रांजल देठे, संचालन प्रा. महेश गेडाम तर आभार प्रदर्शन सौरभ मिश्रा यांनी मानले. स्नेहभोजनाने प्रकाशन सोहळ्याचा आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular