Various public welfare initiatives organized to mark the birth anniversary of the late MP Balubhau Dhanorkar
चंद्रपूर :- आपल्या धडाडीच्या नेतृत्वाने, अथांग जनसंपर्काने आणि सामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याच्या वृत्तीने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची जयंती आज, ४ जुलै रोजी भावनाविवश आणि कृतज्ञ वातावरणात साजरी करण्यात आली. बाळूभाऊ आज शरीराने आपल्यात नसले, तरी त्यांचा लोककल्याणकारी विचारांचा आणि अखंड जनसेवेचा वारसा सक्षमपणे पुढे नेण्यासाठी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक व लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व सोहळ्यांना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. दिवसाची सुरुवात लोकनेते बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून झाली. सकाळी १० वाजता वरोरा आणि सकाळी ११ वाजता भद्रावती येथील ‘खासदार प्रतिभा धानोरकर जनसंपर्क कार्यालय’ येथे बाळूभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. बाळूभाऊंच्या वंचित आणि गरजू घटकांच्या सेवेच्या व्रताला स्मरून भद्रावती येथील वृद्धाश्रम येथे अनाथांना व वृद्धांना अन्नधान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी अत्यंत संवेदनशीलतेने जपण्यात आली. Tribute Paid to Late MP Balubhau Dhanorkar Through Blood Donation

बाळूभाऊंच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या लोकसेवेच्या ध्यासाला मानवंदना देण्यासाठी चंद्रपूर येथील खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी १ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “रक्तदानातून बाळूभाऊंना आदरांजली देण्यात आली. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेल्या अथांग प्रेमापोटी दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर, सुभाष गौर, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, प्रोपेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, प्रवीण काकडे, नगरसेवक वसंता देशमुख, नगरसेवक सुनील खंडेलवाल,नगरसेवक पप्पू देशमुख, नगरसेवक राहुल चौधरी, बांधकाम सभापती तथा नगरसेवक रोशन पचारे, माजी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे, काँग्रेस नेते शामकांत थेरे, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, दीपक जेऊरकर, मनीष तिवारी, नरेंद्र बोबडे, दीपक मित्रा, अश्विनी खोब्रागडे, मीनाक्षी गुजकर, शालिनी भगत, दीक्षा सातपुते, बीबीचे उपसरपंच आशिष देरकर, दिलीप चौधरी, संजय ढवस, रवी झाडे, सौरभ ठोंबडे, रामदास भिसडे, राज यादव, शहजाद सैयद, स्वप्नील कांमळे, अनिल सुरपाम अतुल पिंपळकर, अतुल वाघमारे, गुंजन येरमे, अमित सिडाम, दीपक मित्रा, मोनू रामटेके, मनीष दास, तोफीक शेख, सुरज कन्नूर, प्रेमानंद जोगी, सुधाकर चिकनकर, बंटी घोरपडे, सुधाकर चुनारकर यांची उपस्थिती होती.
जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या बाळूभाऊंच्या धोरणाचा पुढचा टप्पा म्हणून, दुपारी १:३० वाजता विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे आधी आयोजित केलेल्या आयुष्मान कार्ड शिबिरातील गरजू लाभार्थ्यांना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते आयुष्मान कार्डांचे वाटप करण्यात आले. याच सोहळ्यात रुग्णांच्या सुविधेसाठी आणि आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे ३ ‘फिझर यंत्र’ जनसेवेत समर्पित करण्यात आले.