Hotel owners receive lessons on Food Safety Administration regulations
चंद्रपूर :- जिल्ह्यातील हॉटेल/रेस्टॉरंट/बेकरी/डेअरी/कॅटरर्स/ स्विटमार्ट व इतर अन्न व्यवसायिकांची अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयामार्फत बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सहायक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कापगते, मेघा फाळके, कुणाल मुळे व प्रणय कांबळे यांच्यासह 70 अन्न व्यवसायिक उपस्थित होते. Hotel owners receive lessons on Food Safety
सदर बैठकीमध्ये अन्न व सुरक्षा आयुक्त यांनी 23 जून 2026 रोजी निर्गमीत केलेल्या आदेशाच्या अनुषगांने तेलाचे पुर्नवापर, सुरक्षित पिण्याचे पाणी नाकारणे, तापमाण नियंत्रण त्रूटी, वैद्यकीय तपासणी नसलेले कर्मचारी, अन्न व्यवसायिकांना आवश्यक परवाना/नोंदणी प्रमाणपत्र, वर्तमानपत्रात अन्न देण्यास बंदी, पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र, कच्चे व शिजवलेले अन्न, शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ यांची वेगवेगळी साठवणूक व तयार अन्नपदार्थात फुड कलरचा वापर न करणे, अशा विविध मुद्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली. बाल गुन्हेगारी कायदे अधिक कडक करा……
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 मधील विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून आयुक्तांच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अन्न व्यवसायिकांना सुचित करण्यात आल्याचे सहायक आयुक्त उमप यांनी कळविले आहे.