Sunday, May 10, 2026
HomePoliticalबसपाची शहर संघटना मजबूत करण्यासाठी पदनियुक्त्या जाहीर

बसपाची शहर संघटना मजबूत करण्यासाठी पदनियुक्त्या जाहीर

Appointments Announced to Strengthen BSP’s City Organization

चंद्रपूर :- बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर शहर यांच्या वतीने शहर कार्यकारिणीची बांधणी BSP तसेच विविध पदांच्या नियुक्तीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. १० मे २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत संघटन मजबुतीकरणावर विशेष भर देण्यात आला. Strengthen BSP’s City Organization

बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. लाडे हे उपस्थित होते. शहराध्यक्ष इंजि. विमित कोसे यांनी बैठकीचे नियोजन केले, तर लोणारे (विधानसभा) यांनी बैठकीचे संचालन केले.

बैठकीदरम्यान शहर कार्यकारिणीच्या विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार कार्तिक वनकर यांची शहर महासचिवपदी, प्रणित तोडे यांची शहर सचिवपदी, प्रविण कांबळे व शैलेश खोबरागडे यांची शहर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच विवेक दुपारे यांच्याकडे शहर चंद्रपूरच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

यासोबतच बाबूपेठ, लालपेठ आणि भिवापूर झोनची जबाबदारी देत किशोर चिकटे व भोला दुधगवळी यांची झोन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बैठकीत विधानसभा स्तरावरही पदनियुक्ती करण्यात आली असून श्री. अजबराव मनोहर यांची विधानसभा सचिवपदी निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीस पक्षाचे स्टार प्रचारक नवानंद खंडाळे, विधानसभा उपाध्यक्ष नितेश नरगडे, अखिल निमगडे, आलोक बांबोडे, मारुती गेडाम, कांबळे साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादाजी धाकडे यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular