Tributes from the BSP on the occasion of the birth anniversary of Krantisurya Mahatma Phule
चंद्रपूर :- महान समाजसुधारक, स्त्री-शिक्षणाचे जनक आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी (बसपा) BSP शहर तर्फे आज विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहरातील आजाद गार्डन येथे महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के…..
महात्मा फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री-मुक्ती आणि शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांवर चालून समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

