‘Stand with Science’ Message by Kalyan College of Nursing
चंद्रपूर :- आरोग्य क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करण्याचा संदेश देत कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा तर्फे उपजिल्हा रुग्णालय (SDH) राजुरा येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. World Health Day
ट्रॅक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश……
टुगेदर फॉर हेल्थ : स्टँड विथ सायन्स या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०२६ च्या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून वैद्यकीय पुराव्यांवर आधारित आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. दुपारी १२:३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात ANM, GNM, BSc तसेच पोस्ट बेसिक BSc नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अफवा व चुकीच्या माहितीचे दुष्परिणाम अधोरेखित करणारे प्रभावी पथनाट्य सादर केले. यासोबतच वैज्ञानिक आरोग्यसेवेची प्रगती दर्शविणारी पोस्टर स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती, ज्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘Stand with Science’ Message by Kalyan College of Nursing
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलमेथे उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी नर्सिंग व्यावसायिकांना आरोग्य व्यवस्थेचा कणा संबोधत, आजचे विद्यार्थी सहानुभूतीसोबतच वैज्ञानिक अचूकतेने आरोग्य क्षेत्रात नेतृत्व करण्यास सज्ज आहेत असे गौरवोद्गार काढले.
यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रितू दमढे, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य संतोष शिंदे, शिक्षकवृंद तसेच रुग्णालयातील विविध विभागांचे वॉर्ड इंचार्ज उपस्थित होते.
प्राचार्य शिंदे यांनी महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यातील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सार्वजनिक आरोग्याचा अनुभव मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी झाली. यामध्ये त्यांनी Evidence-based Care म्हणजेच पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
या उपक्रमातून सायन्ससोबत उभे राहा हा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचविण्यात यश मिळाले.
