Wednesday, April 15, 2026
HomeBussinessराज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा

Adequate Stock of Petroleum Products in the State

मुंबई / चंद्रपूर :- राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या 25.36 लाखांवर पोहोचली असून एका महिन्यात 73 हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. सीजीडी पाईपलाईनसाठी ‘Deemed Permission’ देण्याचा निर्णय घेतल्याने नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेले आहे त्याठिकाणी ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही, त्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून महाराष्ट्रात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिली. Adequate Stock of Petroleum Products

ट्रक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश……

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत डिग्गीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी शिधा नियंत्रक चंद्रकांत डांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘पीआयबी’च्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा, तेल उत्पादक राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, कृषी संचालक सुनिल बोरकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

पीएनजी व सीजीडी नेटवर्कला चालना : मध्यपूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला असला, तरी राज्यातील पुरवठा सुरळीत असल्याचे सांगून अपर मुख्य सचिव डिग्गीकर म्हणाले, जिथे शक्य आहे तिथे पीएनजीचा वापर वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाईप लाईन गॅस पुरवठा शक्य आहे, त्या ठिकाणी 30 जून पर्यंत पीएनजी बंधनकारक असून ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही, त्या ठिकाणा एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे. Comprehensive Measures by the Government to Ensure Smooth LPG Supply

राज्यात सुमारे 24 तेल डेपोमार्फत 8100 पेट्रोल पंपांना सेवा पुरवली जात असून दररोज सुमारे 18500 केएल पेट्रोल आणि 40000 केएल डिझेलचे वितरण केले जात आहे. 1 ते 4 एप्रिल दरम्यानची विक्रीही मागील महिन्यांच्या सरासरीशी सुसंगत असल्याने इंधनटंचाईची स्थिती नाही.

एलपीजी पुरवठा नियंत्रणात; डिजिटल बुकिंगला प्रोत्साहन – शिधा नियंत्रक श्री.डांगे यांनी सांगितले की, राज्यातील 23 बॉटलिंग प्लांट्समार्फत सुमारे 2200 वितरक आणि 3.5 कोटी ग्राहकांना सेवा दिली जाते. घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज सरासरी 5.82 लाख रिफिल वितरित केले जात आहेत. वितरण पारदर्शक करण्यासाठी डीएसी (Delivery Authentication Code) सक्तीचा करण्यात आला आहे. ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारेच बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले असून सध्या 95 टक्के बुकिंग ऑनलाईन होत आहेत. न्याय्य वितरणासाठी बुकिंग अंतराल निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा टप्प्याटप्प्याने व्यावसायिक एलपीजीचे वाटप टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा क्षेत्रांना 100 टक्के पुरवठा, तर संरक्षण, रेल्वे, पोलीस यांसारख्या विभागांना 70 टक्के पुरवठा राखण्यात आला आहे. उद्योग आणि इतर क्षेत्रांना 20 टक्के ते 50 टक्के पर्यंत पुरवठा दिला जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांना प्राधान्याने अतिरिक्त 20 टक्के वाटप करण्यात आले आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई  घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभर दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. 1 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान 14329 तपासण्या छापे अंतर्गत 3628 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान 21 वाहतूक वाहने जप्त करण्यात आली असून 2 गॅस कॅप्सूल/टँकर्सही ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एलपीजी गॅसचे एकूण प्रमाण 71565.14 किलो इतके आहे. या प्रकरणांमध्ये 53 गुन्हे नोंदविण्यात आले असून 36 जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गॅस व वाहनांची एकूण अंदाजे किंमत 2 कोटी 38 लाख 54 हजार 493 रुपये आहे.

नियंत्रण कक्ष व तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय  – राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. एलपीजी पुरवठ्यासंदर्भात तक्रारींसाठी 9769919221 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 17 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान 2409 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular