Robotics Extravaganza at Infant Convent: Students Present Impressive, State-of-the-Art Projects
चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी, राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व तंत्रज्ञान कौशल्याला वाव देणारी रोबोटिक्स प्रदर्शनी उत्साहात पार पडली. Robotics Extravaganza at Infant Convent
इयत्ता ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांनी विविध आधुनिक व उपयुक्त रोबोटिक प्रकल्पांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या प्रदर्शनीत ‘रेन डिटेक्टर सेंसर फॉर क्लॉथ’, ‘स्मार्ट प्लांट हेल्थ मॉनिटर’, ‘दृष्टीहीनांसाठी स्मार्ट ब्लाइंड स्टिक’, ‘विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट अलार्म क्लॉक’, ‘स्मार्ट हेल्मेट सेफ्टी सिस्टम’, ‘इमर्जन्सी वाहन प्राधान्य असलेला स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल रोबोट’, ‘एल्डरली फॉल डिटेक्शन व बेबी मॉनिटरिंग सिस्टम’, ‘ऑटोमॅटिक टर्निंग एक्सीडेंट प्रिव्हेन्शन’ तसेच ‘ऑटोमॅटिक गॅस लिकेज डिटेक्टर’ अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश होता. Students Present Impressive, State-of-the-Art Projects

