Friday, May 22, 2026
HomeAgriculture‘कृषी सखीचे दुसरे नैसर्गिक शेती’ प्रशिक्षण संपन्न

‘कृषी सखीचे दुसरे नैसर्गिक शेती’ प्रशिक्षण संपन्न

Second ‘Krishi Sakhi Natural Farming’ training program was successfully conducted at Anand Niketan Agricultural College

चंद्रपूर :- आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत अभियान अंतर्गत दि २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत “कृषी सखीचे नैसर्गिक शेती” या विषयावर दुसरे पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश कृषी सखींना नैसर्गिक शेतीचे सैद्धांतिक व प्रत्यक्ष ज्ञान देणे हा होता. ‘Krishi Sakhi Natural Farming’ training

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, आत्मा चंद्रपूरचे प्रकल्प संचालक अरुण कुसळकर, नोडल अधिकारी डॉ. सतीश इमडे, प्रशिक्षण समन्वयक राहुल तायडे, तज्ञ प्रशिक्षक संदीप खिरटकर उपस्थित होते.

पहिल्या दिवशी डॉ. आर. व्ही. महाजन, डॉ. व्ही. व्ही. पाटील व कु. व्ही. आर. पुसडेकर (सहाय्यक प्राध्यापक, कृषीशास्त्र) तसेच तज्ञ प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली घनजीवामृत, वर्मी कंपोस्ट, वर्मीवॉश यांची प्रत्यक्ष निर्मिती प्रशिक्षण देण्यात आले. Anand Niketan Agricultural College

दुसऱ्या दिवशी नैसर्गिक शेतीची तत्त्वे, संकल्पना व मॉडेल शेतरचना यावर डॉ. एस. आर. इमाडे (सहाय्यक प्राध्यापक, कृषीशास्त्र) यांनी मार्गदर्शन केले. कीड व रोग व्यवस्थापनावर श्री. एन. डी. गजबे व डॉ. पी. एन. राखोंडे यांनी, तर मृदा आरोग्य व सेंद्रिय पदार्थ वाढीवर डॉ. एस. एस. पोतदार यांनी सविस्तर माहिती दिली. सायंकाळी वनस्पतीजन्य कीडनाशके व जैव घटकांवर डॉ. स्वाती जी. लोणाग्रे यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण झाले.

तिसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थ्यांना पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री. सुभाष शर्मा (तिवसा, जि. यवतमाळ) यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पास क्षेत्रभेट देण्यात आली. या भेटीत डॉ. एस. आर. इमाडे, डॉ. पी. एन. राखोंडे, श्री. एन. डी. गजबे व डॉ. ए. एफ. भोगावे यांनी मार्गदर्शन केले.

चौथ्या दिवशी फळपिकांतील नैसर्गिक शेतीवर डॉ. ए. एफ. भोगावे (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या) यांनी, तर देशी गायीच्या भूमिकेवर डॉ. एम. एन. पाटोणद (पशु व दुग्ध संवर्धन विभाग ) यांनी मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेती मॉडेल शेत प्रात्यक्षिकावर श्री. संदीप खिरतकर व श्री. बोरकुटे ( तज्ञ प्रशिक्षक ) यांनी अनुभव कथन केले. यानंतर जीवामृत व बीजामृत निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

शेवटच्या दिवशी नैसर्गिक शेती प्रमाणीकरण यावर कृषीभूषण श्री. शिवराम घोडके (बळीराजा कृषी विज्ञान मंडळ, बीड) यांनी मार्गदर्शन केले. विपणन व उद्योजकता विकासावर श्री. ए. एम. कुसाळकर (प्रकल्प संचालक आत्मा , चंद्रपूर) व डॉ. आर. एम. पारधी (सहाय्यक प्राध्यापक, कृषी अर्थशास्त्र) यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषी ॲप नोंदणीबाबत श्री. विशाल घागी व श्री. आर. एन. कण्णके (गट तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा )यांनी माहिती दिली.

समारोपप्रसंगी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू डॉ अशोक धवन तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी रसायनशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ अशोक कडलक उपस्थित होते. त्यांनी उपस्थित कृषी सखींना नैसर्गिक शेतीची गरज तथा त्याचे शेतीचे भविष्य या विषयावर मार्गदर्शन केले. Agriculture

दुपारच्या अभिप्राय सत्रानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम नैसर्गिक शेतीचा प्रसार व शाश्वत शेती पद्धतींच्या अंमलबजावणीस निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केला.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन नोडल अधिकारी डॉ सतीश इमडे, प्रशिक्षण समन्वयक राहुल तायडे, प्रशिक्षण समितीचे सदस्य डॉ रामचंद्र महाजन,डॉ विजय पाटील, कु वैशाली पुजदेकर, डॉ स्वप्नील पंचभाई तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular