Monday, April 20, 2026
HomeCrimeस्थानिक गुन्हे शाखेने केली जबरी चोरी उघडकीस

स्थानिक गुन्हे शाखेने केली जबरी चोरी उघडकीस

Local Crime Branch uncovered a major robbery

चंद्रपूर :- सावली तालुक्यात महिला बचत गटाच्या अध्यक्षेच्या पर्सची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. LCB uncovered a major robbery

दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी कविता दुमाजी बालदलवार (वय ४२, रा. लोंढोली, ता. सावली, जि. चंद्रपूर) या ज्योतीबा महिला बचत गट व दुर्गा बचत गट, सावली यांच्या अध्यक्ष असून, दोन्ही गटाची ४२,००० रुपये रक्कम पर्समध्ये ठेवून जमा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, सावली येथे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून पलायन केले होते. Crime News
या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून पोलीस स्टेशन सावली अप. येथे गुन्हा क्रमांक १४/२०२६, कलम ३०४(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग चंद्रपूर व उपविभाग मूल येथील पथके रवाना करण्यात आली. मुखबिरांची माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी आरोपी गोपाल उर्फ कोब्राभाई जीवन मालाकार (वय ३१, रा. शामनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) व आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख (वय २२, रा. फुकटनगर, चंद्रपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिर्यादीकडून जबरदस्तीने हिसकावलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, चेतन गज्जलवार, पोअं हिरालाल गुप्ता, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, सुमीत बरडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular