State Chief Secretary interacted with leprosy patients and disabled students and praised the initiatives at Anandwan
चंद्रपूर :- थोर समाजसेवी व पद्मश्री पुरस्कार प्राप्त बाबा आमटे यांनी आनंदवन (ता. वरोरा) येथे स्थापन केलेल्या विविध उपक्रमांना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी बुधवारी (दि. 21) भेट दिली. डॉ. विकास आमटे यांच्या नेतृत्वात महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांच्या सेवेसोबतच येथील प्रत्येक नागरिकांच्या हाताला काम व विविध प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसीत होत आहे, हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले. यावेळी त्यांनी कुष्ठरुग्ण व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणे संवाद साधला.
LCB ने केली जबरी चोरी उघडकीस
या भेटीदरम्यान नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्षमी बिदरी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, वरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके, महारोगी सेवा समितीच्या अंतर्गत व्यवस्थापन प्रमुख पल्लवी कौस्तुभ आमटे, विश्वस्त सुधाकर कडू, सदाशिव ताजणे, जनसंपर्क अधिकारी राजेश ताजणे आदी उपस्थित होते.

