Monday, April 20, 2026
HomeElectionनगर विकास आघाडीचा दणदणीत विजय

नगर विकास आघाडीचा दणदणीत विजय

Rajura Municipal Council subject committee elections concluded

चंद्रपूर :- राजुरा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुका आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी पार पडल्या. या निवडणुका पीठासीन अधिकारी आशिष चौहान यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस, शेतकरी संघटना व खुली नगर विकास आघाडी यांनी एकत्रितपणे बाजी मारत नगरपालिकेच्या सर्व विषय समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नगर विकास आघाडीने बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य, स्वच्छता तसेच नियोजन व पाणीपुरवठा अशा सर्व महत्वाच्या समित्यांवर सत्ता मिळवली आहे. Rajura Municipal Council subject committee elections

निवडणुकीत पुढीलप्रमाणे सभापतींची बिनविरोध निवड झाली. यात स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती- अनंतकुमार ताजने, बांधकाम समिती सभापती- अनु हरर्जित सिंग संधू, पाणीपुरवठा व नियोजन समिती सभापती- दिलीप देरकर (उपाध्यक्ष), शिक्षण समिती सभापती- पूनम गिरसावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती- गीता पथाडे, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक, स्थायी समिती सदस्य- रमेश नळे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. Nagar Vikas Aghadi achieved a resounding victory

या निवडणुकीनंतर पार पडलेल्या विशेष बैठकीस नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष दिलीप देरकर, तसेच नगरसेवक रमेश नळे, सिद्धार्थ पाथडे, गीता पथाडे, ईश्वर ठाकरे, इंदूबाई निकोडे, पोर्णिमा सोयाम, वज्रमाला बतकमवार, संध्या चांदेकर, निता बानकर, फरीना सय्यद, मंगला मोकडे, स्वप्नील मोहुर्ले, जुबेर शेख, किशोर हिंगाणे, एजाज अहेमद, भुवेश मेश्राम, प्रफुल कावडे, मयुरी पहानपटे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नगर विकास आघाडीच्या या यशामुळे राजुरा शहराच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular