Inauguration of the Oil Mill and Godown Project of the Sayukta Agro Farmers Producer Company
चंद्रपूर :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत “सयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.” शेगाव (बु.) यांच्या ऑईल मिल व गोडाऊन उपप्रकल्पाचा उद्घाटन समारंभ बुधवारी, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आष्टा मेन रोड, शेगाव (बु.) ता. वरोरा येथे पार पडणार आहे. Agricultural
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन खा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, खासदार यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमास श्री. विनय गौडा जी. सी. (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी चंद्रपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला श्री. उमेश घाटगे, विभागीय कृषि सहसंचालक नागपूर विभाग, श्रीमती प्रज्ञा गोळघाटे, विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट नागपूर, श्री. शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चंद्रपूर, श्री. अरुण कुसळकर, प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर, श्री. विरेंद्र राजपूत, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्रीमती कविता हरीणखेडे, उपविभागीय कृषि अधिकारी वरोरा, श्री. गणेश मादेवार नोडल अधिकारी स्मार्ट, श्री. रवि राठोड, तालुका कृषी अधिकारी वरोरा, तसेच श्री. विजय काळे मंडळ कृषी अधिकारी शेगाव आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

