Saturday, May 30, 2026
HomeUncategorizedवन्यजीव सप्ताहानिमित्त ताडोबात पक्षीनिरीक्षण, श्रमदान व विद्यार्थी जागृती अभियान

वन्यजीव सप्ताहानिमित्त ताडोबात पक्षीनिरीक्षण, श्रमदान व विद्यार्थी जागृती अभियान

Student awareness campaign in Tadoba on the occasion of Wildlife Week

चंद्रपूर :- वन्यजीव सप्ताहाच्या तिस-या दिवशी आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या Tadoba Andhari Tiger Project सर्व वनपरिक्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. यात पक्षीनिरीक्षण, श्रमदान, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवविषयक जागृती अभियान यांचा समावेश होता. Bird watching,  and student awareness campaign in Tadoba on the occasion of Wildlife Week शेगाव पोलीसांची धडक कारवाई, 2 किलो गांजा जप्त

कोळसा वनपरिक्षेत्रातील कौशल्य विकास अकादमी पांगडी येथील विद्यार्थी, शिक्षक तसेच वनकर्मचारी, मजूर, पर्यटक मार्गदर्शक यांनी मिळून पांगडी तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण केले. श्री रुंदन कातकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोळसा (वन्यजीव) यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. 4 प्रकरणे ‘ऑन द स्पॉट’

मोहर्ली (वन्यजीव) वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 153 हत्तीसराड नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रात वडोली नाल्यावर, तर कारवा वनपरिक्षेत्रात कवट झोरा नाल्यावर श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा व चिखलझोरा नाल्यावर दगडी बंधारा बांधण्यात आला. वनपाल, वनरक्षक, मदतनीस या सर्वांनी श्रमदानात सहभाग घेतला. ओला दुष्काळ जाहीर करा.. चक्काजाम आंदोलन

ताडोबा वनपरिक्षेत्राच्या वतीने आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध व प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव, निसर्गाचे संतुलन व संवर्धन याबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली. मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रातही जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जंगलात नेऊन वन्यजीव विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular