📰 ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानिकांसाठी राखीव सफारी – ८ ऑक्टोबरपासून नवा उपक्रम सुरू
चंद्रपूर :- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या आंदोलन दिनी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पाठपुराव्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने स्थानिक नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी मोहर्ली प्रवेशद्वारावर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यकारी समितीसमोर ठेवलेल्या प्रस्तावास दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आगरझरी बफर गेट येथे दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्व सहा जिप्सी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात
एका जिप्सीसाठी (६ सीटर) ५००० रुपये शुल्क आकारले जाईल, बुकिंग सुविधा फक्त उपसंचालक (कोर), ताडोबा कार्यालयातील क्रुझर बुकिंग काउंटरवर उपलब्ध राहील, बुकिंग कालावधी सफरीच्या ७ दिवस आधीपासून एक दिवस आधीपर्यंत, सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत असेल या योजनेची अंमलबजावणी बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ पासून केली जाणार आहे.
सद्यस्थितीत ताडोबात स्थानिकांच्या सोईसाठी ९ सिटर क्रुझर सेवा उपलब्ध असून, मोहर्ली प्रवेशद्वारासाठी ४ व कोलारा प्रवेशद्वारासाठी ३ क्रुझर कार्यरत आहेत. दररोज १४ क्रुझरमार्फत सकाळ व दुपारच्या फेर्यांमध्ये एकूण १२६ पर्यटकांना प्रवेश मिळतो. क्रुझर सफारीचे शुल्क फक्त ७२० रुपये असून कॅमेरा शुल्कात १०० टक्के सूट देण्यात आली आहे.
