Wednesday, June 3, 2026
HomeMaharashtraआवाळपूर येथे महसूल सप्ताहांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

आवाळपूर येथे महसूल सप्ताहांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Chhatrapati Shivaji Maharaj Maharaj Sewa Samadhan Camp organized at Awalpur under Revenue Week

प्रमोद खिरटकर
कोरपणा तालुका प्रतिनिधी

कोरपणा :- तालुक्यातील आवाळपूर येथे ०४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्य शासनाच्या आदेशानुसार १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ४ ऑगस्ट रोजी आवाळपूर (ता. कोरपना)येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन मा. उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरपना तहसीलदार श्रीमती पल्लवी आखरे होत्या. यावेळी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, सेतू केंद्राचे ऑपरेटर, ग्रामसेवक, तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजनेची ओळखपत्रे, अधिवास प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे, तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे यांचे वाटप करण्यात आले. नागरिकांच्या गरजांनुसार विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिबिरास सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना चे संचालक विकास दिवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

-‘महसूल सप्ताहादरम्यान कोरपना तालुक्यातील सर्व मंडळांतून गावागावांत दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यात आला’.- बाळकृष्ण काकडे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे

-‘ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ गावातच एका छताखाली देण्याचा हा उपक्रम उपयुक्त ठरल्याने स्थानिक ग्रामस्थांना व गावाकऱ्यांना यांचा फायदा झाला’ – विकास दिवे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरपना.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular