Friday, April 17, 2026
HomeMaharashtraमहसूल सप्ताह, 27 अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

महसूल सप्ताह, 27 अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

Revenue Week, 27 officers and employees donated blood

चंद्रपूर :- महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय चंद्रपूरच्या वतीने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. Revenue Week, 27 officers and employees donated blood

नियोजन भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 27 अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात 161 लाभार्थ्यांनी विविध तपासणीचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी कोमल मुनेश्वर व त्यांचे चमूचे सहकार्य लाभले.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, रवींद्र माने, उपजिल्हाधिकारी संजय पवार, शुभम दांडेकर, अतुल जटाळे, तहसीलदार विजय पवार, अधीक्षक नरेश बहिरम आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular