Wednesday, June 3, 2026
HomeCrimeवरोरा येथील घरफोडीचा गुन्हा १२ तासांत उघड

वरोरा येथील घरफोडीचा गुन्हा १२ तासांत उघड

Burglary case in Warora solved within 12 hours – three accused arrested

चंद्रपूर :- वरोरा शहरातील घरफोडीच्या प्रकरणाचा LCB स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने अवघ्या १२ तासांत तपास करून तिघा सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. Burglary Crime in Warora solved within 12 hours

दिनांक ११ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही रेकॉर्डवरील गुन्हेगार घरफोडी करून चोरी केलेल्या मालासह वावरण्याची शक्यता आहे.

सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कर्मवीर वॉर्ड वरोरा येथील अनिल उर्फ कुंभकर्ण येलज्जी लोणारे (वय ३०), अरविंद उर्फ कावळा नामदेव सातपुते (वय ३८) आणि रंगा शंकर चिंतलवार (वय ५५,) यांना ताब्यात घेतले. Chandrapur Crime

तपासादरम्यान चौकशी केली असता, त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक ४२९/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या कडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. Local Crime Branch Chandrapur

तिन्ही आरोपींना वरोरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ धनराज करकाडे, पोहवा अजय बागेसर, सचिन गुरनुले, चेतन गज्जलवार, किशोर वाकाटे, गणेश भोयर, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे, वृषभ बारसिंगे आणि मिलिंद टेकाम या सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने केली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular