Meeting of BJP former corporators in the backdrop of Chandrapur Municipal Corporation elections
चंद्रपूर :- आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर Hansraj Ahir आणि आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जनसंपर्क वाढविण्याच्या तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीला महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप नेते अशोक जिवतोडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, दशरथ सिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, रवी जोगी, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्नील डुकरे, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य तुषार सोम, वनिता कानडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. Meeting of BJP former corporators in the backdrop of Chandrapur Municipal Corporation elections

