Friday, April 17, 2026
HomeEducationalपँथर्स स्पोर्ट्स अकादमी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पँथर्स स्पोर्ट्स अकादमी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Guru Purnima program concluded with enthusiasm at Panthers Sports Academy

चंद्रपूर :- पँथर्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने दिनांक १२ जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य श्री. उमेश पंढेरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर भैया रायपूरकर आणि मनसे जिल्हा प्रमुख श्री. मनोज तांबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Gurupurnima at Panthers Sports Academy

कार्यक्रमात पालक वर्गातील श्री. अमित अग्रवाल, श्री. जगन दुर्गम, श्रीमती प्रशांती दुर्गम, श्रीमती हिना दरबार, श्रीमती पद्मा पांडे यांचीही उपस्थिती होती. क्रीडा विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.

या वेळी पँथर्स स्पोर्ट्स अकादमीतील जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. मानसी दरबार, कु. श्रुती दुर्गम, कु. निर्जला अनारसे, म. नवराज पाटील, कु. अमित अग्रवाल, कु. काजल देवांगन, कु. रेश्मी देवांगन, कु. यामिनी देवांगन, कु. शगुन चौहान यांचा समावेश होता.

राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या रिया नवनीत काटकर, आदित्य बाजीराव निकाळजे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत आणि एआययू खेलो इंडिया स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंमध्ये मानसी दरबार, श्रुती दुर्गम आणि रिया काटकर यांचाही गौरव झाला.

विशेष आकर्षण ठरली जिल्ह्यातील सर्वात कमी वयाच्या सुवर्णपदक विजेती, सात वर्षांची चाहक अमित अग्रवाल, जिने नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

कार्यक्रमात मान्यवरांनी खेळाचे फायदे, अकादमीच्या प्रयत्नांचे कौतुक व खेळाडूंना मार्गदर्शन केले. पँथर्स स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष व चंद्रपूरचे पहिले कुस्ती एनआयएस प्रशिक्षक श्री. मुकेश पांडे आणि त्यांच्या टीमच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत करण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular