महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सिमेवर नाकाबंदी करुन
गौवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या १७ पिकअप वाहने पकडुन
५३ गौवंशीय जनावरांची सुटका
एकुण २४ आरोपी अटक, १,५२,७५,०००/- रु चा मुद्देमाल
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
चंद्रपूर :- आज दिनांक ७ जुलै, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके चंद्रपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईकरीता मध्यरात्री पोलीस स्टेशन टेकामांडवा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहितीवरुन महाराष्ट्र तेलंगणा राज्य सिमेवर चिखली खुर्द वन तपासणी नाका येथे सापळा रचुन एकुण १७ पिकअप वाहने थांबवून त्यातील एकुण ५३ गौवंशीय जनावरांची सुटका केली.
सदरच्या ५३ गौवंशीय जनावरे कत्तीकरीता वाहतुक करणारे एकुण २४ आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद कारवाई दरम्यान वाहने व गौवंशीय जनावरे असा एकुण १,५२,७५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री जगन्नाथ मडावी, सफौ/२९६७ स्वामीदास चालेकर, पोहवा /११७६ किशोर वैरागडे, पोहवा /१७८४ अजय बागेसर, पोहवा /२५३५ संतोष येलपुलवार, पोहवा /२५४९ नितीन रायपुरे, पोहवा /१२२७चेतन गज्जलवार, पोहवा /२१८० जयसिंह, पोहवा /१४५ सुरेद्र महंतो, पोहवा /२४९३ गणेश मोहुर्ले, पोहवा /२५५५ प्रमोद कोटनाके, पोहवा / ७८८ नितेश महात्मे, पोअ/६२० मिलींद जांभुळे, पोअं/२२५५ गणेश भोयर, पोअं/५१८ गोपीनाथ नरोटे, पोअं/२७६९ शेखर माथनकर, पोअं/८८७ प्रफुल्ल गारघाटे, पोअं/२०८७ प्रदिप मडावी, पोअं/रविंद्र पंधरे, पोअं/राहुल बनकर, पोअं/सुजर अवथरे, चालक पोअं/मिलींद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोस्टे टेकामांडावा यांनी केली आहे.
