Vanchit Bahujan Mahila Aghadi staged a protest at the District Collector’s Office against injustice done to workers
चंद्रपूर :- जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना उपलब्ध असलेल्या सुविधांपासून जाणूनबुजून वंचित ठेवून, बोगस बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ दिला जात आहे. संबंधित अधिकारी कामगारांच्या ९० दिवसांच्या नाका प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. कामगारांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गांधी चौकातील महानगरपालिका पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता गौरकर यांनी दिली. VBA stages protest at District Collector’s Office against injustice against workers
केंद्र सरकारने चार कामगार संहिता मंजूर केल्या. परंतु या संहितांमध्ये बांधकाम कामगारांशी संबंधित सर्व कायद्यांना केराची टोपली दाखवून कामगार संहितेच्या सामाजिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हे कामगार अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांना ९० दिवसांचा नाका प्रमाणपत्र मिळतो पण ग्रामसेवक, ग्रामपंचायत सचिव किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला आहे. अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी शिवाय कामगारांना काम मिळत नाही. त्यामुळे अनेक कामगारांना रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. VBA Women’s Wing
बांधकाम कामगारांना जिल्हा पातळीवर साहित्य दिले जात आहे. हे साहित्य त्यांना तहसील पातळीवर देण्यात यावे, नोंदणीकृत कामगारांना योजनेचे लाभ तात्काळ देण्यात यावे, जनविरोधी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४ तात्काळ रद्द करावे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी इत्यादी मागण्यांसह कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गौरकर यांनी दिली आहे.
या मोर्चात वंचित बहुजन महिला आघाडी निर्माण कामगार संघटना कृती समिती आणि शिवराज्य कामगार संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता गौरकर यांनी बांधकाम कामगार, पुरुष आणि महिलांना संघटित मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आयोजित पत्रकार परीषदेला कविता गौरकर, सरचिटणीस अलका मोटघरे, अवंतिका उके, ललिता गेडाम, प्रमोद बोरघाटे आदी उपस्थित होते.