Asha Bawne (Health Assistant Officer) honored with the State Level Florence Nightingale 2025 Award
चंद्रपूर :- गडचिरोली जिल्ह्यात परिचर्या क्षेत्रात २४/४/१९९७ ते २०२५ पर्यंत एकुण २८ वर्षाच्या कालावधीत २२ वर्षे आदिवासी क्षेत्रात निस्वार्थपणाने रुग्णाची सेवा व सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालय आरोग्य विभाग मुंबई तर्फे राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार २०२५ हा प्रथम पुरस्कार जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील श्रीमती आशा वामनराव बावने (सहाय्यक अधिसेविका) यांना कोल्हापुर येथे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवुन सन्मानीत करण्यात आले आहे. State Level Florence Nightingale 2025 Award
या कार्यक्रम सोहळ्याला आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर, राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोटे, खासदार धैर्यशील माने, आरोग्य विभागाचे सचिव मुंबई डॉ. निपूण विनायक, डॉ. विरेन्द्रसिंह, आरोग्य आयुक्त मुंबई श्रीरंगा नायक तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सी.ई.ओ. तसेच आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक (शुश्रूषा) मुंबई डॉ. पुरुषोत्तम मडावी, सहाय्यक संचालक (शुश्रूषा) मुंबई, डॉ. निलीमा सोनावणे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पाडला.

सहायक अधिसेविका आशा बावणे यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१७ ते २०२४ या काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान केली आहे.

