Akshata Dhale succeeds in Staff Selection Commission exam
चंद्रपूर :- राजुरा येथील कु. अक्षता हरिदास ढाले हिने स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 703 वा क्रमांक मिळवला असून तिची इंडियन ब्युरो ऑफ माईन्स नागपूर येथे निवड झालेली आहे. Akshata Dhale felicitated by Teli community
मद्य परवाना वाटप अनियमितता, SIT ला 177 पानांची तक्रार
अक्षता ढाले हिने केमिकल इंजिनियर मध्ये बी.ई. केले असून तीने कठोर परिश्रमातुन मिळविलेले यश तेली समाजातील तरूणांना प्रेरणादायी आहे. याची दखल घेऊन तेली समाज युवक मंडळ राजुरा च्या वतीने तीच्या घरी प्रत्यक्ष भेटून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि तिला तिच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
विशेष बाब म्हणजे तीच्या या यशाबद्दल संपूर्ण राजुरा तालुक्यातील विविध स्तरातून तीच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. Akshata Dhale succeeds in SSC exam
अनेक युवकांचा युवक काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
यावेळी तेली समाज युवक मंडळ, रामपूर राजुरा चे पदाधिकारी प्रा. देविदास कुईटे, प्रविण वैरागडे, किशोर रागीट, जगदिश साठोने, राजकुमार भुरे, अक्षताचे आई, वडील, कुटुंबीय उपस्थित होते.
