Monday, May 11, 2026
HomeAccidentचंद्रपूर जिल्हा रुग्णालयात ॲम्बुलन्ससाठी रुग्ण ताटकळत : ॲम्बुलन्स ची संख्या वाढवा

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात ॲम्बुलन्ससाठी रुग्ण ताटकळत : ॲम्बुलन्स ची संख्या वाढवा

Increase the number of ambulances – MNS

चंद्रपूर :- जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे रुग्णांना पुढील उपचारासाठी हलविण्यासाठी ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका) ची कमतरता असल्यामुळे बऱ्याच रुग्णांना झळ सोसावी लागत आहे, याची दखल घेत MNS मनसेने रोजगार स्वयंम रोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा शल्य चिकित्सक यांना ॲम्बुलन्सची संख्या वाढवण्याची मागणी केली. Increase the number of ambulances – MNS

स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत अक्षता ढाले ला यश

सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी सामान्य रुग्णालय चंद्रपूर वार्ड क्र.8 येथून बंडू सती बावणे ह्या रुग्णाची तब्येत जास्त खराब असल्याने दुपारी 12 वाजता नागपूर रेफर करण्यात आले असता त्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता त्या 108 वाल्यांनी सारवासारव करत त्या रुग्णांच्या कुटुंबीयांना रात्री 10 वाजेपर्यंत 108 नंबरची ॲम्ब्युलन्स Ambulance उपलब्ध करून दिली नाही. Patients waiting for ambulances at Chandrapur District Hospital

दरम्यान त्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर रोजगार स्वयं रोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ तांबेकर ह्यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठून रुग्णालयाचे डीन डॉ. कांबळे यांचेशी संपर्क साधून रुग्णाला तात्काळ अँब्युलन्स ची व्यवस्था करून रात्रौ 12 वाजता नागपूर करिता हलवले. Manoj Tambekar District President of Employment, Self Employed Department of MNS 

177 पानांची मद्य परवाना अनियमिततेची SIT कडे तक्रार

या गंभीर बाबीची दखल घेत दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी मनसे रोजगार स्वयं रोजगार जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ तांबेकर ह्यांच्या नेतृत्वात सामान्य रुग्णालय चंद्रपूर चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चींचाडे यांना रुग्णालयात अधिकाधिक अँब्युलन्स ची संख्या वाढविण्यात यावी यासाठी निवेदन सादर करून मनसे तर्फे मागणी करण्यात आली. Maharashtra Navnirman Sena (MNS)

यावेळी राज वर्मा जिल्हा उपाध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार विभाग चंद्रपूर, संदीप पटेल शहर संघटक रोजगार स्वयं-रोजगार विभाग चंद्रपूर शहर, वर्षाताई भोमले शहर अध्यक्षा महिला सेना, मंदाताई कऱ्हाडे शहर उपाध्यक्षा महिला सेना सह मनसे पदाधिकारी तथा मनसैनिक उपस्थित होते.

 

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular