Pistol and cartridge seized from criminal on record
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB ने गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर रोडवरील चुना भट्टी बस स्टॉप येथे देशी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली त्याचेजवळून एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. Pistol and cartridge seized from criminal on record
पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले स्टाफसह पेट्रोलिंग करीत असतांना खबर मिळाली की, चुना भट्टी बस स्टॉप परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला आरोपी अग्नीशस्त्र बाळगून आहे, माहिती मिळताच पोउपनि भुरले स्टाफसह चुना भट्टी परिसरात दाखल होत रेकॉर्डवरील आरोपी संगम संभाजी सागोरे (28 वर्ष), रा. मित्रनगर, चंद्रपूर याला ताब्यात घेत त्याचे जवळून एक लोखंडी गावठी बनावटी देशी कट्टा व एक 9 एम.एम. जिवंत काडतूस जप्त करीत बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Chandrapur Crime
संदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठवार, दिपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.
