Friday, January 17, 2025
HomeUncategorizedचंद्रपूर विधानसभा काँग्रेस की राष्ट्रवादी (एस पी) राष्ट्रवादी चा उमेदवार शर्यतीत

चंद्रपूर विधानसभा काँग्रेस की राष्ट्रवादी (एस पी) राष्ट्रवादी चा उमेदवार शर्यतीत

चंद्रपूर विधानसभा काँग्रेस की राष्ट्रवादी (एस पी)

राष्ट्रवादी चा उमेदवार शर्यतीत

चंद्रपूर :- आगामी विधानसभा अनुषंगाने सर्वच पक्षाची मोर्चेबांधणी सुरु झाली तर उमेदवार ही घोड्याला बार्शीग बांधून मैदानात उतरले आहेत बहुतांश उमेदवार तर ‘हवे मे तिर’ या प्रमाणे सभा, बैठका, मोर्चे यातून आपल्या ‘अर्था’ तून अर्थ काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

मी डॉक्टर, मी पोलीस अधिकारी माझा अनुभव जास्त, मी जास्त सुशिक्षित यामुळे मला अमुक पक्षाची सीट मिळेल तमुक पक्षाची सीट मिळेल याची शर्यत जणू विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागलेली चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात दिसत आहे.

चंद्रपूर विधानसभा 71 ही महाविकास आघाडी पक्षाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला जाणार असे भाकीत बहूचर्चित आहे, महाविकास आघाडी च्या समीकरणा मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे तर राष्ट्रवादी आणी शिवसेना (उबाठा) यांनी दावेदारी केली आहे.

अश्यातच राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रभारी जिल्हाप्रमुख बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात भानेश मातंगी यांनी विधानसभेची दावेदारी केली आणी जिल्हाप्रमुख यांनीही त्यांना उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आश्वासन दिले. यावरून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता काँग्रेस सोबतच राष्ट्रवादी ही आपली दावेदारी करीत असल्याचे पुढे आले आहे.

भानेश मातंगी मागील 7 -8 वर्षांपासून समाजकार्यात अग्रेसर आहेत. ते जणू भाजपा, काँग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यां समवेत असतात परंतु त्यांची कार्यकीर्द भाजपात जास्त प्रचलित आहे.
आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाद्वारे विधानसभा उमेदवारीची मागणी केलेली आहे.

“महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी ची युती गत कित्येक वर्षांपासून आहे, चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस च्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी राष्ट्रवादी खांद्याला खांदा लावून समर्थन देत राहिली आणी माननीय पवार साहेबांच्या आदेशाने देतही राहील, परंतु जिल्हातील चंद्रपूर आणी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मागील 30 वर्षांपासून काँग्रेस उमेदवारी घेऊन निवडणूक लढवत आहे परंतु कधी जिंकत नाही आहे, करीता आता चंद्रपूर आणी बल्लारपूर विधानसभा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाला द्यावी आणी आम्ही या जिंकूनही दाखवू, कारण महाविकास आघाडी समीकरण यात जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रातील उर्वरित 4 क्षेत्रात काँग्रेस लढवणार यात राजुरा, ब्रम्हपुरी, चिमूर आणी वरोरा विधानसभा हे काँग्रेस पक्ष लढवणार आणि उर्वरित चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा राष्ट्रवादी समर्थीतपणे लढणार आणी जिंकणार यामुळे पक्षाचे निरीक्षक पनकुले साहेबाना आम्ही या दोन जागेची मागणी केलेली आहे आणी सदर मागणी पूर्णतःवस होणारच आहे.”

बेबीताई उईके, कार्याध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा

“मी मागील 8 वर्षांपासून समाजकारण व राजकारणात सक्रिय आहे, चंद्रपूर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल आणी त्यासाठी मी उमेदवारीची मागणी केलेली आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा माझा दांडगा अनुभव आहे. संधी मिळाल्यास पूर्ण ताकदीने स्वतःला झोकून जात, धर्म, पंथ सोडून शिक्षा, आरोग्य, रोजगार आणी सर्वसामान्यांचे रास्त प्रश्न याकडे लक्ष देईल”

भानेश मातंगी, उमेदवार

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular