Sahitya Ratna Dr. Annabhau Sathe’s 104th birth anniversary celebrations were held at Jivati
चंद्रपूर :- साहित्यिकांच्या साहित्याने जिवनाला नविन दिशा मिळत असते. साहित्य रत्न डॉ. अण्णाभाऊ साठे Sahitya ratna Annabhau Sathe यांचे देखील साहित्य प्रत्येकाच्या जिवनाला प्रेरणा देणारे आहे, असे उद्गार खासदार प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांनी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती सोहळ्या निमित्त आयोजित जिवती येथील कार्यक्रमात केले.
दलित साहित्याचे संस्थापक म्हणून डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख होत असला तरी त्यांचे साहित्य प्रत्येकांच्या जिवनाला दिशा देणारे आहे, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांची भुमिका व त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या जिवनाला नविन दिशा देणारे आहे, असे मत यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.