75 VBA and BJP workers from Gondpipri taluka join Congress
चंद्रपूर :- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांच्या विविध विकासकामे आणि त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर विश्वास व्यक्त करीत गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागातील वंचित, भाजप पक्षातील जवळपास ७५ कार्यकर्त्यांनी आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते काँग्रेस जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आ. सुभाष धोटे यांनी सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन काँग्रेसमध्ये स्वागत केले. 75 VBA and BJP workers from Gondpipri taluka join Congress
यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यामध्ये सकमूर येथील शाहीराज अलोने, बबन रामटेक, सुबोध फुलझेले, आनंदराव वाकुडकर, विनोद झाडे, अभय झाडे, गोवर्धन प्रल्हाद अलोने, गोवर्धन सुदाम अलोने, शिवराम झाडे, संघर्ष कोरडे, विभाकर शेरके, मोहन तांगडे, शिवाजी काळे, बाल्या तांगडे, दत्ता वेलादी, सुरज मुत्तेमवार, व्यंकटी नारनवरे, किशोर घुबडे, प्रकाश अलोने, रूपेश पुंजनकर, पुरुषोत्तम कोरडे, जालिंदर तोहगावकर, महेश तोहगावकर, खुशाल कोरडे, नितेश कोटावार, अविनाश अलोने, मारोती अलोने, चेकदरूर येथील संजय झाडे, विजय पुणेकर, सुजीत घुरके, आनंदराव घुरके, रविंद्र घुरके, विजय खोब्रागडे, देवाजी अलोने, पंकज खोब्रागडे, मिथुन देठे, शैलेश देठे, गुलाबराव घुरके, विलास देठे, भिमराव देठे यासह गोंडपिपरी तालुक्यातील वंचित आणि भाजप च्या जवळपास ७५ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अशोक रेचनकर, देविदास सातपुते, नामदेव सांगडे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, संजय झाडे, साईनाथ कोडापे, नरेंद्र वाघाडे, लोकचंद रायपूरे, गौरव घुबडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.