Chandrapur police take major action; 57 grams of MD drugs seized from accused on record
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर केलेल्या धडक मोहिमेतून रहमतनगर भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून मोठ्या प्रमाणात (MD Drugs) एम.डी. मॅफेड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत 57.260 ग्रॅम मॅफेड्रॉन पावडरसह एकूण कि.491100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी मोहम्मद शादाब अब्दुल रऊफ शेख (रा. रहमतनगर, चंद्रपूर) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur Police take major action
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि रामनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी केली. Joint operation by Local Crime Branch, Chandrapur and Ramnagar Police Stations स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी स्वतःच्या घरात विक्रीसाठी एम.डी. पावडर बाळगत असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून पंच व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. Police Raid तपासादरम्यान आरोपीकडून अमली पदार्थासह रोकड आणि इतर साहित्य असा एकूण 491100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 57 grams of MD drugs seized from accused on record
या प्रकरणी एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ कलम ८(क), २१(क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
सदर कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, सपोनि निलेश वाघमारे, सपोनि देवाजी नरोटे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ. स्वामीदास चालेकर, पोहवा. प्रकाश बल्की, पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा, दिपक डोंगरे, पोहवा. इमरान खान, पोहवा. किशोर वैरागडे, पोहवा. अजय बागेसर, पोहवा. लालु यादव, पोहवा.बाबा नैताम, पो.अं. हिरालाल गुप्ता. पो. अं. शशांक बदामवार, पोअं. गोपीनाथ नरोटे, पोअं. शेखर माथनकर मपोअं. उषा लेडांगे, विजयमाला वाघमारे, दिपीका सोडनार, निराशा तितरे, अर्पणा मानकर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर तसेच पोलीस ठाणे रामनगर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन
“अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही गंभीर व समाजासाठी घातक बाब आहे. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा साखळीचा नायनाट करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालीबाबतची माहिती त्वरित चंद्रपूर पोलिसांच्या व्हॉट्सअँप क्रमांक 7887890100 वर द्यावी.”
