Tuesday, October 20, 2026
HomePoliceकस्तुरबा रोडवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

कस्तुरबा रोडवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

उजव्या हातावर ‘विनोद’ नावाचे गोंदण; नातेवाईकांचा शोध सुरू

चंद्रपूर :- शहरातील कस्तुरबा रोडवरील प्रिन्स बारसमोरील फुटपाथवर अंदाजे ४८ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. Unknown Dead body found in Chandrapur

सदर मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर ‘विनोद’ असे नाव गोंदवलेले आहे. या खुणेच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास मदत होऊ शकते.

संबंधित व्यक्तीला ओळखणाऱ्या नागरिकांनी किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत माहिती असणाऱ्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक : ९१५६२८३८७६ / ८००७८४४९२२ Chandrapur City Police Station

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांकडे काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने वरील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular