Monday, March 17, 2025
HomeUncategorizedसिडीसीसी बँकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन

सिडीसीसी बँकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन

सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.

आमरण उपोषणकर्ते रमेश काळबाँधे यांच्यासह रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व इतरांनी मुंडन करुन केला निषेध.

चंद्रपूर :- सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट व बोगस नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे आमरण उपोषण सुरु आहे त्याचा आज 10 वा दिवस असून आमरण उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिडीसीसी बँकेच्या बोगस नोकर भरतीचा निषेध करण्यासाठी समितीचे सदस्य व आमरण उपोषणकर्ते रमेश काळबांधे यांनी आमरण उपोषणाच्या 5 व्या दिवशी स्वतः मुंडन करुन निषेध केला आहे व त्यांनी सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष संचालकांना इशारा दिला आहे की आज आम्ही केवळ मुंडन केलं आहे जर भरती रद्द केली नाही तर तुम्हची प्रतिकात्मक शवयात्रा काढू, दरम्यान यावेळी रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या अनेक सदस्यांनी आरक्षण डावलून भ्रष्ट मार्गाने केलेल्या नोकर भरतीचा निषेध केला आहे. यावेळी समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, राजेश बेले, आशिष ताजने, महेश वासलवार, सुनील गुढे, विजय तूरक्याल, पियुष धुपे, स्वप्नील देव व इतर समिती सदस्यांची उपस्थिती होती.

राज्यात सद्या सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरतीचा मुद्दा गाजत असून मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नौकर भरतीत डावलल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन आणि 16 जानेवारी पासून समितीचे मनोज पोतराजे आणि 21 जानेवारी पासून रमेश काळाबाँधे आमरण उपोषण करत आहे,

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular