इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या व शिवाजी, संभाजी महाराजांबद्दल अवमानजनक भाष्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांचेवर कठोर कारवाई करा
संभाजी ब्रिगेड ची मागणी
चंद्रपूर :- कोल्हापुरातील इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक आणि एकेरी भाषेचा वापर करणाऱ्या प्रशांत कोरडकर, नागपूर याच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड चंद्रपूर च्या वतीने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रासह समस्त भारत देशाचे आराध्य दैवत असून त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य शिवप्रेमी आहेत. दिनांक 25 फेब्रुवारी मध्यरात्रीला प्रशांत कोरटकर यांनी इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांना मोबाईलद्वारे फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच संभाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य विधाने आणि एकेरी भाषेचा वापर केला.
.
याबाबीमुळे देशभरातील असंख्य शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या जातीयवादी माणसावर कठोर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा व तत्काळ अटक करण्यात यावी तसेच या प्रशांत कोरटकर यांच्या मागे कोणत्या विकृत समाजविघातक शक्ती आहेत त्याचा शोध घ्यावा अन्यथा असंख्य शिवप्रेमी त्याविरुद्ध तीव्र आवाज उचलणार अश्या आशयचे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष डॉ दिलीप चौधरी, शरद पवार विचार मंच चे जिल्हाध्यक्ष एड निमेश मानकर, छत्रपती महोत्सव समितीचे संतोष कुचनकर, सह्याद्री प्रतिष्ठान चे निशिकांत देशमुख, बाबाराव सातपुते, एड गजानन नागपुरे, चंद्रकांत वैद्य, विनोद थेरे आदींची उपस्थिती होती.



