Friday, July 10, 2026
HomeEducationalरोजगार मेळाव्यात 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड

रोजगार मेळाव्यात 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड

121 trainees shortlisted at the job fair in Mul

रोजगार मेळाव्यात १२१ जणांची प्राथमिक निवड

*मूल येथील रोजगार मेळाव्यातून 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड*

*Ø विविध नामांकित कंपन्यांकडून मार्गदर्शन व मुलाखती*

चंद्रपूर :- मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे आयेाजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून विविध कंपन्यांमार्फत 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथामिक निवड करण्यात आली आहे. तर 52 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या मेळाव्यात 312 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सुचना केंद्र, मा.सा. कन्नमवार शासकीय आौद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल आणि क्रांतीकारी खुदीराम बोस शा. औ. प्र.संस्था, सावली यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर रोजगार मेळाव्याचा उद्देश संस्थेतील प्रशिक्षणार्थी, आजी-माजी प्रशिक्षणार्थी तसेच बेरोजगार युवक-युवतींना विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता.

या मेळाव्यात औद्योगिक क्षेत्रातील संभाजीनगर येथील इंड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लिमि. आणि एन.आर.बी. बिअरींग, नाशिक येथील एन.व्ही.के. पावर तर चंद्रपूर येथील व्ही. आर. एंटरप्रायझेस, पार्श्व किया मोटर्स प्रा. लि., वैभव एंटरप्रायझेस, व्ही वन सी एंटरप्रायझेस या आस्थापनांनी सहभाग नोंदविला. सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संस्थेची कार्यपद्धती, उपलब्ध पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य विकास, वेतनश्रेणी, सेवा अटी, पदोन्नतीच्या संधी तसेच उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या बदलत्या गरजांविषयी उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, शिस्त, कार्यसंस्कृती आणि व्यावसायिक आचारसंहिता याबाबतही माहिती दिली.

यानंतर सहभागी कंपन्यांकडून पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुलाखतीत सहभाग नोंदविला. रोजगार मेळाव्यामुळे उमेदवारांना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची, त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्याची तसेच रोजगाराच्या संधी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली. संस्थेच्या प्राचार्या जे. व्ही. निंबार्ते व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रोशन गभाले यांच्या मार्गदर्शनाखाली पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular