Dhariwal’s social initiative; spontaneous participation by 134 blood donors
चंद्रपूर :- एखाद्या अनोळखी असलेल्या व्यक्तीच्या जीवनात रक्तदान करून अंकुर फुटविणे हे एक पुण्यरूपी आहे. आज च्या परिस्थितीत अनेक निष्पाप नागरिकांना रक्त उपलब्ध नसल्याने आपले प्राण गमवावे लागतात. समाजातील प्रत्येक नागरिकांनी हे सद्कार्य करून आपल्या सामाजिक ऋणाची परतफेड करण्याची गरज आहे हेच उद्दिष्ट समोर ठेवून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड चे प्लांट हेड देवेश कुमार यांनी दिली. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिराच्या माध्यमातून तब्बल १३४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. Dhariwal’s social initiative Blood Donation camp
यावेळी महाव्यवस्थापक कौशिक भट्टाचार्य, अतुल गोयल, उपमहाव्यवस्थापक चंदन नंदी, दिनेश गाखर, मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिष नायर, सौगतो मुखर्जी , मनोज कुमार, व्यवस्थापक संदीप ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे”. एका बाटली रक्तदानामुळे अनेक अमूल्य जीव वाचू शकतात, सामाजिक बांधिलकी जपत आणि परिसरातील रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी हे शिबीर नक्कीच फलदायी ठरेल. प्रत्येक वर्धापन दिनाला रक्तदान करून पुण्यरूपी कार्य आपल्या उद्योगाच्या माध्यमातून होत असते. या शिबिर यशस्वी करण्यात सर्व कर्मचारी व कामगार स्वयंस्फूर्तीने समोर येत आपले सामाजिक कर्तव्य निभावतो हे एक समाधानाची व गर्वाची बाब आहे असे भावोद्गार देवेश कुमार यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केले.
जिल्ह्यात रक्ताचा तुडवडा असतांना धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड च्या माध्यमातून सामाजिक कर्तव्य भावनेतून हे रक्तदान शिबीर होत आहे. यात सहभागी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करीत या एका रक्त पिशवीतून विविध जर्जर आजारांकरिता उपचार घेत असलेल्या रुग्णांना नक्कीच मदत होईल असा सार्थ विश्वास आपल्या प्रतिपादनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. राहुल मडावी यांनी व्यक्त केला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनाकारीता संतोष काकडे, रवी चावरे, हर्ष तोमर, प्रतीक वानखेडे, अमोल मुंजेवार व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील राकेश शेंडे व चमू यांनी विशेष प्रयत्न केले.

धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड च्या वतीने कामगारांना हेल्मेट चे वितरण Helmet Distribution
सर्व कामगारांची अंतर्गत व बाह्य सुरक्षा हे लक्ष ठेवून सर्व कामगारांना धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड च्या वतीने हेल्मेट चे वितरण करण्यात आल्याची माहिती यावेळी स्टेशन हेड देवेश कुमार यांनी दिली. अनेक कामगार हे दुचाकी ने उद्योगात येतात मात्र अनेक कामगार हे विना हेल्मेट प्रवास करतांना आढळून आल्याने रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत सर्व कामगारांना हे हेल्मेट वितरित करण्यात आल्याचेही देवेश कुमार यांनी पुढे बोलतांना सांगितले.
