Friday, October 31, 2025
HomeCrimeगणेश विसर्जन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धारदार शस्त्रासह इसम ताब्यात

गणेश विसर्जन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धारदार शस्त्रासह इसम ताब्यात

Youth detained with sharp weapon on the backdrop of Ganesh Visarjan festival

चंद्रपूर :- गणपती विसर्जन उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत ५ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या आदेशाने डी.बी. पथक व स्टाफसह गस्तीदरम्यान साहिल विश्वजितकुमार सिंग (वय २९ वर्ष, रा. लालपेठ कॉलरी क्रमांक ३, चंद्रपूर) हा इसम धारदार शस्त्रासह आढळून आला. Youth detained with sharp weapon on the backdrop of Ganesh Visarjan festival गणेश विसर्जन “सुरक्षेची घ्या काळजी”

चंद्रपूर शहर पोलीसांना मुखबिराकडून माहिती मिळाल्यानुसार, रामाळा तलावाजवळील एका देवळाजवळ एक इसम लोकांना धमकावत आहे, यावरून पोलिसांनी तत्काळ छापा घातला. पोलिसांना पाहून इसम पांढऱ्या रंगाच्या HYUNDAI कंपनीच्या i20 MAGNA (क्र. MH 34 AA 6291) गाडीत बसला. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत चालकाच्या सिटखाली १६ इंच लांबीचा स्टील धातूचा धारदार व टोकदार चाकू आढळून आला. Chandrapur city police take drastic action गणपती विसर्जन… चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

यावरून शहर पोलिसांनी त्या इसमाच्या ताब्यातून एक धारदार टोकदार चाकू, पांढरी Hyundai i20 Magna कार अंदाजे किंमत अंदाजे ५,००,००० रुपये असा एकूण ५,००,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे गुन्हा क्र. ६४९/२०२५, कलम ४, २५ भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. झरपट नदीवरील पूल कोसळला

सदर कारवाई पोलीस अधीक्षकमुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, मपो. हवा. भावना रामटेके, पो. हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, नापोशि. कपुरचंद खरवार, पो.अं. योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, मपोशि. सारीका गौरकार व दिपीका झिंगरे यांनी केली.

या कारवाईमुळे गणपती विसर्जन उत्सवात नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular