Youth arrested with sharp weapons in Chandrapur city
चंद्रपूर :- शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बाबूपेठ परिसरात धारदार शस्त्र बाळगणाऱ्या युवकाच्या घरी धाड टाकत तीन धारदार शस्त्र जप्त करीत आरोपीला अटक केली आहे. Youth arrested with sharp weapons in Chandrapur एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला हरी पप्पु गोस्वामी (वय १९ वर्षे, रा. सोनामाता मंदिरमागे, बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर) हा इसम धारदार हत्यार घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने पंचासमक्ष त्याच्या राहत्या घरी धाड टाकत घराची तपासणी केली असता झडती दरम्यान घरातील लाकडी पलंगाखाली प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवलेली १ लोखंडी तलवार, १ धारदार कोयता व १ पात्याचा चाकू अशी धारदार शस्त्रे आढळून आली यावरून आरोपी विरूद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७१४/२५, कलम ४, २५ भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा नोंद करीत एकूण ५,००० रुपये किंमतीची तीन शस्त्रे जप्त करण्यात आली. Chandrapur City Police
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सपोनी राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पोहवा लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, मपोहवा. भावना रामटेके, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, मपोअं. सारीका गौरकार व दिपीका झिंगरे यांनी केली.