Sunday, June 21, 2026
HomeUncategorizedयोगाने घडेल निरोगी समाज - डॉ. अशोक जीवतोडे

योगाने घडेल निरोगी समाज – डॉ. अशोक जीवतोडे

International Yoga Day Celebrated with Enthusiasm at Janata College

चंद्रपूर :- योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, असे प्रतिपादन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले. Yoga Will Create a Healthy Society – Dr. Ashok Jivtode

जागतिक योग दिनानिमित्त स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय असल्याचे सांगत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले. निरोगी, सुदृढ आणि सकारात्मक समाजाच्या निर्मितीसाठी योग संस्कृतीचा प्रसार ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. International Yoga Day Celebrated at Janata College

आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा जागतिक योग दिन शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आयोजित योग सत्रात शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि योगप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध योगासने व प्राणायामाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई जीवतोडे, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. कुचनकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे, प्राचार्य डॉ. राजेंद्र भगत, राजेश भोजेकर, प्रमोद काकडे, हैदर शेख, सारंग पांडे, धनंजय शास्त्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.

योगगुरू मधुकर राजूरकर, राजकुमार गावंडे, सुनीता गावंडे, अनिता खामणकर, माधवी चार्लीकर, मनीषा वासलवार, रश्मी दासरवार आणि मायाताई बेले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो उपस्थितांनी निरोगी जीवनाचा संकल्प करत योगाचा लाभ घेतला.

या उपक्रमामुळे जनता महाविद्यालय परिसरात आरोग्याविषयी जागरूकता वाढून सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular