Students of Savitribai Phule College, Gadchandur won the district level elocution competition
चंद्रपूर :- महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरच्या विद्यार्थीनिंनी बाजी मारली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधान व आजची स्त्री या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत वर्ग १२ वा विज्ञान ची विद्यार्थिनी कु पुष्पा राठोड हीने आपल्या वक्तृत्वाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत प्रथम क्रमांक पटकावला. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि रोख रक्कम ३००० रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप होते.
तसेच या स्पर्धेत तृतीय क्रमांक याच कनिष्ठ महाविद्यालयाची विध्यार्थिनी कु. तनु सावरकर(वर्ग११वा विज्ञान) हिने पटकाविला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि १००० रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. या विद्यार्थिनीना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन प्रा कु.सोज्वल ताकसांडे यांनी केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकिक केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ आनंदरावजी अडबाले, उपाध्यक्ष तुळशीरामजी पुंजेकर, सचिव नामदेवरावजी बोबडे तथा सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी दोन्ही विद्यार्थीनींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे तथा सर्व प्राध्यापकवृंदानी जिल्हास्तरावर कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव चमकविल्याबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.