Thursday, October 30, 2025
HomeCrime“160 ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोन जेरबंद" 16 लाखांचा मुद्देमाल जप्त”

“160 ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोन जेरबंद” 16 लाखांचा मुद्देमाल जप्त”

Two arrested with 160 grams of MD drugs , worth Rs 16 lakh seized

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने LCB मोठी धडक कारवाई केली आहे. यात चंद्रपूर शहरातील फॉरेस्ट अकादमी, मुल रोड परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या कारमधून तब्बल 160 ग्रॅम एमडी (मेफोड्रॉन) पावडर आणि एकूण 16,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Two arrested with 160 grams of MD Drugs

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, दिपक कृष्णा वर्मा (वय २८, रा. संजयनगर, चंद्रपूर) व आशिष प्रकाश वाळके (वय ३०, रा. मित्रनगर, चंद्रपूर) हे
पांढऱ्या रंगाच्या डिजायर कार (क्र. MH-49 AS-2704) मधून अंमली पदार्थ घेऊन येत आहेत. Chandrapur Crime

त्यानुसार, फॉरेस्ट अकादमी समोर स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी उभारली,  नाकाबंदी दरम्यान संबंधित वाहन आल्यानंतर पोलिसांनी ते थांबवून तपास केला असता, वाहनातून एमडी (मेफोड्रॉन) ड्रग पावडर आढळली. यावरून दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन रामनगर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Major operation in Chandrapur

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता आणि अजित शेंडे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular