Tiger terror in Junona Tower Hill area
The demand of the Pravrutti Foundation for the settlement of the tiger
चंद्रपूर :- शहरात वन्य जीवांचा वावर वाढत असून यातून मानव वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे. दरम्यान शहरातील बाबुपेठ परिसरातील जुनोना टॉवर टेकडी परिसरात वाघाचे पगमार्क बऱ्याच स्थानिक नागरिकांच्या दृष्टीस पडले तसेच काही नागरिकांना वाघाचे दर्शन झाले, Tigers terror करीता काही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने सदर वाघाचा बंदोबस्त करावा या मागणी चे निवेदन प्रवृत्ती बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशिष मासिरकर यांच्या नेतृत्वात विभागीय वन अधिकारी यांना सादर करण्यात आले. Tiger terror in Junona Tower Hill area
शहरात वाघ व बिबट या हिंस्त्र पशुचा शिरण्याचा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत, नुकतेच शहरातील बिनबा गेट परिसरातील एका घरात बिबट ने शिरकाव केला, आठ तासांच्या अथक प्रयत्नाने बिबट ला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले परंतु सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही याचप्रमाणे शहरातील बाबुपेठ परिसरातील जुनोना टॉवर टेकडी परिसरात दोन वाघांचा वावर असून बऱ्याच नागरिकांना वाघाचे पगमार्क व दर्शन झाले यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रवृत्ती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशिष मासिरकर यांची भेट वाघाच्या दहशतीबाबत माहिती दिली.
आशिष मासिरकर यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, मानवी जीवितास धोका निर्माण होऊ नये याकरीता विभागीय वन अधिकारी यांना सदर भागातील वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
विभागीय वन अधिकारी यांनी लवकरच या वाघांचा बंदोबस्त करु असे आश्वासन दिले.
यावेळी शिल्पा कांबळे, आशिष शिरसाट, दिनेश इंगळे, फिरोज खान, मोनिद येरावार आदी प्रवृत्ती सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.