Thursday, April 16, 2026
HomeCrimeभद्रावतीत चोरीचा प्रयत्न फसला : ‘मोबाईल अरुण’ अटकेत

भद्रावतीत चोरीचा प्रयत्न फसला : ‘मोबाईल अरुण’ अटकेत

Theft attempt foiled in Bhadravati, one arrested

भद्रावतीत चोरीचा प्रयत्न फसला – ‘मोबाईल अरुण’ अटकेत, २.५० लाखांचा ऐवज जप्त

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- भद्रावती शहरातील सुर्यमंदिर वार्ड येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या एक इसमाला भद्रावती पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. त्याच्याकडून एकूण 2,50,100 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. Theft attempt foiled in Bhadravati, accuse arrested

दिनांक 23 जुलै 2025 रोजी रात्री मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, सुर्यमंदिर वार्डातील एका घरात एक इसम चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, गोवर्धन पांडे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास ताब्यात घेण्यात आले. Burglary Crime

तपासादरम्यान त्याने आपले नाव प्रमोद उर्फ मोबाईल अरुण अरुण गेडाम (वय 32, रा. रासा घोंसा, भद्रावती) असे सांगितले. चौकशीत त्याने पांडे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. यानंतर पोलीसांनी त्याच्याविरुद्ध गु.र.नं. 331/25, कलम 331(4), 62 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल केला. Bhadravati Police Station

सखोल तपासादरम्यान, आरोपीने सुरक्षानगर, भद्रावती येथील दोन अन्य घरफोड्यांचीही कबुली दिली. या सर्व गुन्ह्यांमध्ये वापरलेला सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2,50,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतून एकाच आरोपीकडून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. योगेश्वर पारधी, सपोनि. विरेन्द्र केदारे, तसेच गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, भुषण चौधरी भद्रावती पोलीस स्टेशन यांनी पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular