Success of Chandrapur Taluka Team in 3rd District Level Taekwondo Competition
चंद्रपुर :- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात 3 री जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा, डी.के. तायक्वांदो असोसिएशन सिंदेवाही तर्फे व तायक्वांदो असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट च्या सहयोगाने जिल्हा महासचिव सतीश खेमस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या स्पर्धेत चंद्रपुर तालुका टीम ने भाग घेत यश प्राप्त केले. तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमी चंद्रपुर चे कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकार नगर तुकुम शाखा चे शिवम किशोर राजनहिरे व प्रज्वल किशोर राजनहिरे यांनी सिल्वर मेडल व प्रज्वल धनंजय शेंद्रे यांनी ब्रांच मेडल तर शहिद भगतसिंग शाळा, भिवापूर येथील सिनिअर विद्यार्थी सौरभ गेडाम यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले. Success of Chandrapur Taluka Team in 3rd District Level Taekwondo Competition
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चंद्रपुर च्या विध्यार्थ्यांमध्ये मीहीत जीवने, सफल हस्तक, शौर्य देवकांत खोब्रागडे हे गोल्ड मेडल चे मानकरी ठरले तर कु इवा वनकर, सानवी कांबळे, रोविन नागदेवते, शौर्य राजेश खोब्रागडे यांनी सिल्वर मेडल तर शार्दूल हस्तक, अर्पित दुबदुबे, विशेष रोहनकर, यांनी ब्रॉंझ मेडल प्राप्त केले.
विद्यार्थ्यांनि आपल्या यशाचे श्रेय मास्टर निर्धार आसुटकर सर, नवनीत मून सर, रितेश पथाडे सर, अंजना शेट्टी मॅडम, आदित्य शेट्टी व पालकवर्ग यांना दिले.