Sixth Bahujan Parishad – Struggle for Equality and Determination for Reform
गणराज्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सहावी बहुजन परिषद दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी “कहीं हम भूल न जायें” या अभियानांतर्गत भारतीय बौद्ध परिषदेच्या भव्य प्रांगणात, इंद्रप्रस्थ नगर, नागपूर येथे अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विदर्भ पातळीवरील ही ऐतिहासिक परिषद मानवतावादी विचारधारेला बळकटी देण्याचे माध्यम ठरली. Sixth Bahujan Parishad
सदर परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे बाराशे हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. विदर्भातील विविध जिल्ह्यांतील नागरिकांनी सदर कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीने परिषद खुल्या आकाशाखाली अभिजात आणि प्रेरणादायी ठरली. परिषदेला मिळालेला जनतेचा उदंड प्रतिसाद बहुजन समाजाच्या जागृतीची आणि चळवळ बळकट होण्याची साक्ष देतो. Struggle for Equality and Determination for Reform

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. अतुल व्ही. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत प्रेरणादायी वक्तव्य ठेवले, तर मार्गदर्शक म्हणून ॲड. रितेश पाटील, इंजी. बाळू रत्नपारखी आणि ॲड. अश्विनी मून यांनी चळवळीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत चळवळीच्या विविध आयामाचे विश्लेषण केले. त्यांचे मार्मिक व प्रभावी भाषण उपस्थितांच्या हृदयात परिवर्तनाची जाणीव निर्माण करणारे ठरले. मानवतावादी आंदोलनाचे सच्चे आणि कर्मठ कार्यकर्ता दिवंगत कविवर्य युवराजजी भांगे यांना सदर परिषदेमध्ये मरणोपरांत “मान्यवर कांशीराम रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण परिषदेचे आयोजन कटीबद्धता, समर्पण आणि प्रबोधनाच्या उच्च हेतूंनी प्रेरित होते. गणराज्य दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष बहुजन समाजासाठी नवा आत्मविश्वास आणि मानवतावादी चळवळी प्रति चेतना जागवणारे ठरणार हे निश्चित.
सहावी बहुजन परिषद म्हणजे समाजातील एकतेचा नवा अध्याय आणि मानवतावादी चळवळीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला ठाम निर्धार होय. नागपूरच्या भूमीने पुन्हा एकदा बहुजन विचारधारेला राष्ट्रीय स्तरावर कृतीत उतरविण्याचा संदेश दिला आहे. परिषदेची प्रस्तावना एन. व्ही. बाराहाते यांनी ठेवली, सूत्रसंचालन काजल मेश्राम आणि प्रिया डोंगरे यांनी केले तर वैशाली गजभिये यांनी आभार मानून परिषदेची सांगता केली.



