Monday, March 17, 2025
HomeAcb Trapसंघर्ष युवा विकास मंडळद्वारे एक्युप्रेशर शिबिराचा शेकडो रूग्णांनी घेतला लाभ

संघर्ष युवा विकास मंडळद्वारे एक्युप्रेशर शिबिराचा शेकडो रूग्णांनी घेतला लाभ

Hundreds of patients benefited from Acupressure Camp by Sangharsh Yuva Vikas Mandal

चंद्रपूर :- मागील २४ वर्षांपासून जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, किडा, पर्यावरण, शेती, जमिन अधिग्रहण या क्षेत्रात कार्य करणारे ग्रामीण भागातील संघर्ष युवा विकास मंडळाद्वारे मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दि. २० जानेवारी ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साखरी (वाघोबा) येथे ६ दिवसीय एक्युप्रेशर चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. Acupressure Camp by Sangharsh Yuva Vikas Mandal

उद्घाटन प्रसंगी पौनी-२ उपक्षेत्रीय प्रबंधक प्रसाद, खाण प्रबंधक सोलंकी, सुरेश गिलोरकर मुख्याध्यापक जि.प. शाळा साखरी, मोरेश्वर थिपे मुख्याध्यापक प्रियदर्शिनी विद्यालय साखरी, वंदनाताई माथनकर  सचिव ग्रामपंचायत साखरी, मंडळाचे अध्यक्ष राजु घरोटे, राहुल सुर्यवंशी भाजयुमो जिल्हा महामंत्री आदींची उपस्थिती होती.

मंडळाच्या माध्यमातून विविध प्रश्न, समस्या व लोकाभिमुख मागण्यांची पुर्तता करण्याकरिता पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे वर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir यांची वेळोवेळी अनुकंपा प्राप्त झाल्याबद्दल मंडळाच्यावतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

राजस्थान येथून आलेल्या डॉ. गुरूप्रित सिह, डॉ. मुकेश चौधरी तसेच सहकारी डॉक्टर्स चमूद्वारे विविध आजाराच्या रूग्णांवर चिकित्सा व उपचार करण्यात आले. या शिबीरात गावातील आणि परिसरातील २७५ नागरिकांनी या चिकित्सा पध्दतीचा लाभ घेतला. यामध्ये युवा, युवती, प्रौढ सर्वांचा आवर्जून सहभाग होता.

९० वर्षांवरील काही शिबीरार्थी ज्यामध्ये धिंडसी निवासी ९८ वर्षीय श्रीमती कौरासे, या आजींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दि. २५ जानेवारी रोजी समारोपिय कार्यक्रमात मान्यवरांचे उपस्थितीत सर्व ज्येष्ठ नागरिकांना, धोतर, टोपी, आणि महिलांना लुगडे, उपक्षेत्र प्रबंधक पौनी-२ यांचे माध्यमातून देण्यात आले.

मंडळाचे सचिव अॅड. प्रशांत घरोटे यांचे मार्गदर्शनात शिबीराच्या यशस्वीतेकरिता सर्वश्री सुदर्शन बोबडे, चंद्रकात लेडांगे, सुरज गोरे, अमोल देरकर, किसन मडावी, संतोष घटे, रामकिसन ताजने, अमोल अडबाले, अनिल गोरे, राकेश उरकुडे, वैभव कावळे, गजानन चोथले, प्रज्वल चोथले, अमोल गोरे, देवराव वरारकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular