चंद्रपूर :- राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाळा येथून चोरीस गेलेल्या रॉयल एनफिल्ड क्लासिक बुलेट मोटारसायकलचा गुन्हे शोध पथकाने (DB Squad) छडा लावला. गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात कारवाई करत पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. Stolen Bullet motorcycle traced to Wardha
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ वाजेपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत चुनाळा येथील त्यांच्या घरासमोर उभी केलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७१३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Rajura Police Station
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तलोडी (कुटकी), ता. सेलू, जि. वर्धा येथे छापा टाकला. या कारवाईत संशयितास शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनुराग प्रवीण धाबर्डे (वय २१, व्यवसाय मजुरी, रा. तलोडी-कुटकी, ता. सेलू, जि. वर्धा) असे आहे. त्याच्याकडून MH 34 AX 1120 क्रमांकाची काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल, अंदाजे किंमत ₹१ लाख, जप्त करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत (उपविभाग राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, तसेच पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलींद जांभुळे, महेश बोलगोडवार, रमेश बस्सी व राजीव दुबे यांनी केली.
