Saturday, September 19, 2026
HomeCrimeसीएसटीपीएसमधील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश

सीएसटीपीएसमधील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश

चंद्रपूर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) परिसरातून होत असलेल्या कॉपर केबल चोरीच्या घटनांचा दुर्गापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी पहाटे केलेल्या धडक कारवाईत तब्बल ६ क्विंटल कॉपर वायर आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त केला. या कारवाईत एकूण १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण किंमत सुमारे २२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Copper cable theft at CSTPS busted

सीएसटीपीएस परिसरात कॉपर केबल चोरीच्या घटना वाढल्याने याप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी विशेष गुन्हे शोध पथक तयार केले होते. पथकाकडून चोरीच्या घटनांचा तपास सुरू असतानाच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईची आखणी केली. Durgapur Police Station

१८ सप्टेंबरच्या पहाटे पोलिसांनी संशयितांवर कारवाई करत सुमारे ६ क्विंटल कॉपर वायर, अंदाजे ७ लाख २० हजार रुपये, तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला सुमारे १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सहदेव कैलास नारनवरे (वय ४०, व्यवसाय नोकरी, रा. वसाहत ऊर्जानगर, ता. जि. चंद्रपूर) यांच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ०३९८/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, चोरीच्या या प्रकरणामागील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेंगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. संदीप बच्छीरे, पोहवा राजू गोखरे, पोअं. संदीप जाधव, सोनल खोब्रागडे, स्विखील उराडे आणि कोमल मोहजे यांनी यशस्वी केली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular